Dog Viral Video : सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. असं म्हणतात की कुत्रा हा माणसाचा अतिशय प्रिय प्राणी आहे. कुत्र्यासारखा प्रामाणिक मित्र कुठेही भेटणार नाही.
सध्या असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा कुत्रा एका दुसऱ्या कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. या दोन कुत्र्याची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आतापर्यंत तुम्ही माणसाच्या आणि कुत्र्याच्या मैत्रीविषयी अनेकदा वाचले असेल पण कुत्र्याची एका दुसऱ्या कुत्र्याबरोबरची मैत्री पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कुत्रा नदीत वाहत असतो. त्यांच्या तोंडात काठी असते. अचानक एक कुत्रा येतो आणि वाहत असणाऱ्या कुत्र्याच्या तोंडातील काठीच्या मदतीने त्याला वरती ओढतो. तुम्हाला व्हिडीओत दिसेल की कुत्र्याने किती हूशारीने दुसऱ्या कुत्र्याचा जीव वाचवला आहे.

हेही वाचा : Jugaad Video : हद्दच केली राव! गॅस नाही म्हणून चक्क इस्त्रीवर बनवले ऑम्लेट, पाहा व्हायरल व्हिडीओ

positivelearner या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “सर्वात मौल्यवान भेटवस्तू, प्रामाणिक मित्र”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणसांपेक्षा प्राणी चांगले असतात” तर एका युजरने लिहिलेय, ” आपण माणसांनी कुत्र्यापासून खूप काही शिकायला पाहिजे” काही युजर्सनी कॅमेरामॅनवर जोरदार टिका केली आहे. एक युजर लिहतो, “शुट करण्यापेक्षा कुत्र्याची जीव वाचवायला पाहिजे होता. खरंच माणूस किती स्वार्थी असतो.”