Taiwan Earthquake : भूकंप हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो. एका क्षणात होत्याचे नव्हते होते. अचानक झालेला भूंकप काही सेकंदामध्ये सर्वकाही उद्धवस्त करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे भूकंपाचा अंदाज बांधता येत नाही. अशावेळी अचानक भूकंप झाला की अनेकदा जीवीतहानी होते पण प्राण्यांना मात्र भूकंप होणार असल्याची आधीच चाहूल लागते. त्यांच्याकडे ती क्षमता असते, असे अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला भूकंप होण्यापूर्वी अंदाज येतो आणि तो पळत सुटतो. त्यानंतर घरच्या लोकांना सावध करतो.
बुधवारी सकाळी तैवानच्या पूर्व किनार्याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.या घटनेत काही लोक जखमी आहे तर काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तैवान येथील एका घरातील हा व्हिडीओ आहे हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला भूकंप होण्यापूर्वी अंदाज येतो आणि तो पळत सुटतो. त्यानंतर तो घरच्या लोकांना सावध करतो.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-04-2024 at 16:28 IST
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending NewsतैवानTaiwanव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Videoसोशल मीडियाSocial Media
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dog sensing the earthquake was about to hit taiwan earthquake video goes viral on social media ndj