सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, परंतु यातील मोजकेच व्हिडीओ असे असतात जे लोकांना भावतात. शिवाय ते आपणाला पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. सध्या अशाच दोन लहान मुलांच्या धाडसी कृत्याचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल यात शंका नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं नाल्यात अडकलेल्या कुत्र्याला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवताना दिसत आहेत. त्यांचं हे धाडस पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. व्हिडीओत एक कुत्रा नाल्याच्या कडेला असणाऱ्या मोठ्या दगडाखाली अडकल्याचं दिसत आहे. शिवाय हा कुत्रा प्रचंड घाबरलेला दिसत आहे. यावेळी दोन लहान मुलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही पाहा- वाशी पुलावरुन समुद्रात उडी मारणार होती महिला, पोलिसांच्या ‘त्या’ कृतीमुळे बचावला जीव, थरारक घटनेचा Video व्हायरल

या नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याचं दिसत आहे, शिवाय ते पाणी खूप दूषित असल्याचं दिसत आहे. तरीही ही लहान मूलं त्या पाण्यातून जातात आणि त्या कुत्र्याला अलगद उचलून नाल्याच्या बाहेर काढतात. हे दृश्य अत्यंत हृदयद्रवक असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झाले आहेत. शिवाय प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना अशी शिकवण द्यायला पाहिजे असंही नेटकरी म्हणत आहेत.

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ arya_vamshi17 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “प्रत्येक पालकांनी मुलांना मुक्या प्राण्यांशी कसं वागावं याची शिकवण द्यावी.” व्हिडीओमध्ये दोन मुले सावधपणे घाबरलेल्या कुत्र्याकडे जाताना आणि काळजीपूर्वक त्याला नाल्यातून बाहेर काढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ७.३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी या चिमुकल्यांचा खूप अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader