Video : असं म्हणतात की कुत्रा हा मांजरीची शिकार करतो. आपण अनेकदा मांजरीला कुत्रा जवळ असताना दूर पळताना पाहिले आहे पण तुम्ही कधी मांजरीने चक्क कुत्र्याची शिकार करताना पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मांजर कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
हेही वाचा : नव्वदीतील आजीने केला भन्नाट डान्स; “मोनिका, ओह माय डार्लिंग” गाण्यावर दाखवला जलवा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मांजर कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे. पुढे मांजर कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्न करत असते आणि कुत्रा मांजरीला भिऊन पळताना दिसत आहे. कुत्रा मांजरीची ही लढाई पाहून तेथील स्थानिक लोकांनी मध्यस्थी केली आणि कुत्र्याचा जीव वाचवला नाहीतर एका कुत्र्याची शिकार खरंच मांजरीने केली असती.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO : पाच मिनिट उशीर होईल पण असा प्रवास करू नका; तरुणीसोबत जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा..
प्राण्यांचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही थरारक तर काही मजेशीर असतात. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युजरने लिहिले, “एका कुत्र्याची शिकार बोक्याने केली, मांजरीने नव्हे” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “घोर कलियुग”. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.