जगभरातील अनेक लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांची घरातील सदस्याप्रमाणेच काळजी घेतात. काहीजण घरातला एक विरंगुळा म्हणून त्यांच्याकडे पाहत असतात. सध्या तर घरामध्ये महागडे प्राणी पाळण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. लोक विविध जातींचे कुत्रा, मांजर खरेदी करतात. शिवाय आपल्या आवडता कुत्रा आणि मांजर घेण्यासाठी ते लाखो रुपये द्यायला तयार असतात, हे आपणाला माहित आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर अशा कुत्र्याची आणि मांजराची चर्चा होत आहे. त्यांच्या किमती ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हो, कारण सोशल मीडियावर ज्या कुत्र्याची आणि मांजराची चर्चा सुरु आहे. त्यांची किमंत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कारण या कुत्र्याची किमंत जवळपास ४००० कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे मांजराच्या एका जातीची किंमत सुमारे ८०० कोटी आहे. पण या प्राण्यांची एवढी जास्त किमंत का आहे? याबाबतची माहिती जाणून घेऊया.

हेही वाचा- Tirumala Tirupati Ticket: तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल तिकीट; जाणून घ्या किंमत

८०० कोटीचं मांजर –

अमेरिकेतील लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टकडे स्कॉटिश फोल्डची एक मांजर आहे आणि तिचे नाव ऑलिव्हिया बेन्सन असं आहे. ही मांजर जगातील तिसरा सर्वात महागडा प्राणी असून, त्याची किंमत सुमारे ८०० कोटी इतकी आहे.

नाला कॅट दुसऱ्या क्रमांकावर –

हेही वाचा- नशेत प्रियकराला चालता येईना म्हणून त्याला खांद्यावरुन घेऊन गेली प्रेयसी; नेटकरी म्हणाले, “गर्लफ्रेंड अशावी तर अशी”

ऑलिव्हिया बेन्सनंतर जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मांजरीचं नाव नाला कॅट असं आहे. @Nala_Cat नावाने एक इंस्टाग्राम अकाऊंट असून या अकाऊंटला जवळपास ४४ लाख लोक फॉलो करतात. या मांजरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत ८२५ कोटी रुपये आहे.

४००० हजार कोटींचा कुत्रा –

जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत एक कुत्रा आहे. जो जर्मन शेफर्ड जातीचा असून त्याचे नाव ‘गुंथर 6’ असं आहे. हा कुत्रा गुंथर कॉर्पोरेशनच्या मालकीचा आहे. या महागड्या कुत्र्याची किंमत तब्बल ४००० कोटी इतकी आहे.

कशी ठरवतात या प्राण्यांच्या किमती –

या महागड्या प्राण्यांची यादी इंस्टाग्राम अॅनालिटिक्सच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. शिवाय हे प्राणी दिवसाला किती पैसे कमावतात हे पाहून त्या प्राण्यांची किंमत निश्चित करण्यात येते. विशेष म्हणजे, टेलर स्विफ्टच्या मांजरीशिवाय अमेरिकन टीव्ही कलाकार ओप्रा विन्फ्रेच्या शैडी, सैनी, लॉरेन, लायला या कुत्र्यांची किंमत सुमारे २५० कोटी रुपये आहे. त्याची किंमत सोशल मीडियावरील अॅनालिटिक्सच्या आधारावर ठरवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dog worth 4000 crores and a cat worth 800 crores why are these animals so expensive find out jap
Show comments