मैत्री हे सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे मग ती मैत्री माणसांची असो की प्राण्यांची. प्राणी हे मुळातच प्रामाणिक असतात ज्यांच्यावर ते जीव लावतात त्यांना ते कधीही एकटे सोडत नाही. दोन कुत्र्यांमधील अशाच निर्मळ मैत्रीची झलक दाखवणार व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंस्टाग्रामवर petlobee1_ नावाच्या पेजवर दोन कुत्र्यांमधील मैत्री दर्शवणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते एका कुत्र्याच्या गळ्यातील दोरी बांधली असून त्या दोरीचे दुसरे टोक घराच्या खिडकीला बांधले आहे. पण आपल्या मित्राची अवस्था पाहून दुसरा कुत्रा त्याच्या मदतीला धावून येतो. त्याच्या गळ्याला बांधलेली दोरी सोडवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओमध्ये दिसते की दुसरा कुत्रा खिडकीला बांधलेली दोरी तोंडात पकडून दाताने तोडण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला ते जमत नाहीये. तो तिथल्या तिथे उड्या मारतो पुन्हा दोरी तोडण्याचा प्रयत्न करतो. ज्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधली आहे तो मात्र शांतपणे उभा आहे. कुत्र्याची आपल्या मित्राला सोडवण्याची धडपड पाहून नेटकरी भावूक झाले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

हेही वाचा – “…अथवा पोकळ बांबूचे”, रिक्षावाल्याने पुणेरी पाटी लावून जोडप्यांना दिली ताकीद, पाहा Viral Photo

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तेरे जैसा यार कँहा” आणि हेच गाणे व्हिडीओला जोडले आहे. व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि लाखो लोकांना व्हिडीओ आवडला आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करून प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. काहींनी कुत्र्याला बांधून ठेवल्याबद्दल चिंता व्यक्त केली तर काहींनी दुरून हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करणाऱ्याची निंदा केली. तर काहींनी दोन्ही कुत्र्यांमधील मैत्रीचे कौतूक केले.

हेही वाचा – मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या जजला भारतीय पाणीपुरीची पडली भुरळ! खाता क्षणी….व्हिडीओ तुफान व्हायरल

व्हिडीओवर कमेंट करताना एकजण म्हणाला, “कुत्र्याच्या गळ्यातील दोरी किती घट्ट बांधली आहे. त्या गळ्याला ताण बसतो आहे. हे फार क्रुर आहे. ” दुसऱ्याने लिहिले,”RIP कॅमेरामॅन” तिसरा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला उद्देशून म्हणाला, तुम्ही देखील मदत करू शकला असता” चौथ्याने लिहिले, “जर लोकांना कुत्र्याबरोबर जर असे वागयचे असते तर ते त्यांना पाळतात का?” चौथ्याने लिहिले,” निस्वार्थ प्रेम”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dogs struggle to save its best friend the viral video won the hearts of netizens snk