Mumbai local video: मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक इथे रिल्स बनवतात, फॅशन करतात. कधी कधी विचार येतो मुंबईची लोकल नसती तर मुंबईचं काय झालं असतं? इतक्या मोठ्या शहराला लोकलनेच सांभाळून घेतलंय. बाहेरून येणारे लोक सुद्धा या लोकलला बघण्यासाठी येतात. मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबईतील लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. बोरीवली लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये एका तरुणानं महिलांसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते.
मायानगरी म्हणून ओळखली जाणारे मुंबई शहर हे लोकल ट्रेनसाठी जगभर प्रसिद्ध आहे. दररोज अनेक प्रवासी या लोकलवर अवलंबून असतात. हीच लोकल ट्रेन अनेकांसाठी जीवनरेखा ठरते. मात्र, आता लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षित आहेत का, हा एक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण लोकलमधील महिल्यांच्या डब्ब्यात घुसलेला दिसत आहे. धक्कादायक म्हणजे महिलांशी अपशब्दात आरेरावी करत बोलत आहेत. अश्लिल हातवारे करत आहे, यावेळी महिला ओरडताना दिसत असून त्यातील एक महिला त्या तरुणाला प्रतिउत्तर देत आहे. घडलेला हा प्रकार त्याच डब्ब्यातील एका प्रवासी महिलेने मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mumbai_tv नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “पोलीस असूनही या लोकांची हिम्मत होते” तर आणखी एकानं, “आता महिलांनी घराबाहेर पडायचं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.