Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारी असतात. प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर नवीन काही तरी पाहायला मिळते. कधी डान्सचे व्हिडीओ, तर कधी भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये तरुंगात कैद असलेला मद्यपी सॅड गाणं गाताना दिसत आहे. त्याचं गाणं ऐकून कोणालाही हसू येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होतोय व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पोलिस स्टेशन दिसेल आणि एक व्यक्ती तुरुंगात कैद असलेली दिसत आहे. तुरुंगात कैद असलेली व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची बॉलीवूड गाणी गाताना दिसत आहे. ती व्यक्ती कधी कोणत्या चित्रपटाचे गाणी गाताना दिसते तर दुसऱ्या क्षणाला दुसरे गाणी गाताना दिसते. हे पाहून तेथील पोलीस सुद्धा जोरजोराने हसताना व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला एक महिला पोलीस लपून हसताना दिसेल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : एका तिकिटावर केली सर्व मित्रांनी यात्रेत एंट्री, तरुणाचा जुगाड पाहून डोकं धराल, व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

shiya_thakur_si या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हिन्दी भाषेत लिहिलेय, “किस्मत के सहारे वो बैठे जिसकी कोशिशे अपांग है, मैं तो मेहनत करुँगी जब तक जारी जंग है।” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्याला बाहेर काढा, त्याने चुकून मद्यपान केले” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “हा शबनमचा आशिक आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. साडे चार लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

Story img Loader