Viral Video : गेल्या काही दिवसांपासून लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी लग्नातील डान्स व्हिडीओ, तर कधी नवरदेव- नवरीचे स्टेजवरील व्हिडीओ चर्चेत येत असतात. सध्या असाच लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाऊ बहिणीला हळद लावताना ढसाढसा रडत आहे. हा भावनिक व्हिडीओ पाहून कुणाचेही डोळे भरून येतील.

हा व्हिडीओ लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा आहे. नवरी खाली बसलेली आहे आणि तिला प्रत्येकजण हळद लावत आहे. जेव्हा नवरीचा लहान भाऊ तिला हळद लावायला येतो, तेव्हा हळद लावताना तो भावूक होतो आणि रडायला लागतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, बहिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून भाऊ ढसाढसा रडत आहे. भावाला पाहून बहिणीलाही अश्रु अनावर होतात आणि ती सुद्धा रडते. बहीण भावाला असे रडताना पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या नातेवाईक मंडळींच्या डोळ्यातसुद्धा पाणी येते. तितक्यात एक महिला नवरीच्या भावाजवळ येते आणि त्याला तिथून घेऊन जाते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक होऊ शकता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Gold Rate : काय सांगता! अमेरिकेत भारतापेक्षा खरंच सोने स्वस्त मिळतं?

@Sunilpanwar2507 या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” बहीण-भावाचं पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं आहे”

हेही वाचा : Viral Video : पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा; गिरक्या घालत केला डान्स, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडीओ खूप हृदयस्पर्शी होता”, तर एका युजरने लिहिले, “असे व्हिडीओ पाहून रडायला येतं.” आणखी एका युजरने लिहिले, “बहीण-भावाचे नाते खूप खास असते. लहानपणापासून प्रत्येकवेळी बरोबर असलेली बहीण एक दिवस घर सोडून जाते, तेव्हा भावाला खूप दु:ख होते.”

Story img Loader