असे म्हणतात की काही फोटोंमध्ये रहस्य दडलेले असते. इंटरनेटच्या जगात असे अनेक फोटो व्हायरलो होत असतात जे लोकांना आश्चर्यचकित करतात. काही फोटो लोकांना विचार करायला भाग पाडतात . काही फोटो असे असतात की जे पाहून धक्का बसतो. असे फोटो एक भ्रम तयार करतात जे आपल्या डोळ्यांना पटकन पाहिल्यवर समजत नाही त्यालाच ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. सध्या अनेक ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो चर्चेत आलेला आहे जो पाहून लोक थक्क झाले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या टि्वटवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कोणीतरी एक दु:खी चेहरा दिसत आहे, तर कोणता अस्वच्छता, खराब रस्ता आणि झोपडपट्टी दिसत आहे. तुम्हाला या फोटोत सर्वात आधी काय दिसते आहे हे पाहा.. सोशल मीडियाच्या यूजर्सला या फोटोमध्ये अस्वच्छता, खराब रस्ता आणि झोपडपट्टी दिसत आहे.. लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला एक चेहरा दिसेल.

हेही वाचा – भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी रस्त्यावर खरेदी केली भाजी: UPI पेमेंटचे झाले चाहते; व्हायरल होतोय व्हिडीओ


हेही वाचा – ”चोली के पीछे” गाण्यावर दिल्ली मेट्रोत तरुणाने केला डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

१८ ऑगस्टला शेअर ही पोस्ट आता पर्यंत २.६ लोकांनी हा फोटो पाहिला आहे, तर ३७ हजार लोकांना अधिक लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘एक सुंदर फोटो.’ पोस्ट पाहण्यासाठी यूजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल हो या फोटोला काही लोक एआय तंत्रज्ञान वापरून तयार केला असल्याचे तर काही लोक तो फोटोशॉप्ड केला आहे असे सांगत आहेत कोणाला या फोटोत रागाने पाहाणारा चेहरा दिसला तर कोणाला दुखी.

एकाने लिहिले की, हे ‘पेरिडोलिया’चे चांगले उदाहरण आहे. तुमच्या माहितीसाठी, कोणत्याही गोष्टीचा एक अर्थ शोधणे किंवा दिसणे याला पेरिडोलिया म्हणतात.

Story img Loader