Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पोट धरून हसवणारे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला प्रेरित करणारे असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा हातात पोस्टर घेऊन भररस्त्यात उभा आहे. त्याने पोस्टरवर एक संदेश लिहिला आहे. हा संदेश वाचून तुम्हीही थक्क व्हाल. या तरुणाने पोस्टरवर काय लिहिलेय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण मुलगा हातात एक पोस्टर घेऊन उभा आहे आणि त्याने त्या पोस्टरवर लिहिलेय, “MRP वर मॉलमध्य शॉपिंग करता राव अन् शेतकऱ्याची भाजी घेताना कमी करता भाव #हक्क”
व्हिडीओत हा तरुण अशा लोकांविषयी नाराजी व्यक्त करताना दिसतो. तो म्हणतो, “MRP वर मॉलमध्ये शॉपिंग करता राव अन् शेतकऱ्याची भाजी घेताना जीव जातो तुमचा आर लाज वाटू द्या तुमच्या या वागण्याची, स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची. आर रक्त आटवलं तेव्हा उगवलं हे सोनं अन् या सोन्या विकतोय आम्ही तुमच्या मनानं” या तरुणाचे शब्द ऐकून तुमच्या अंगावरही काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : खाकीला कडक सॅल्यूट! खवळलेल्या समुद्रात पाय घसरुन पडली महिला, मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे वाचवले प्राण; पाहा video

पाहा व्हायरल व्हिडीओ

sheti_udyojak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सोन्याला विकतोय आम्ही तुमच्या मनानं..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खर आहे दादा असा एक दिवस येणार शेतकरी भाव ठरवणार” तर एका युजरने लिहिलेय, “शेतकरी जेव्हा उन्हात राबतो तेव्हा नोकरीवाल्याच्या घरामध्ये भाकरी भाजते..”
आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर बोलला दाद एकदम खरी गोष्ट आहे भाऊ ..त्यांना काय कळणार शेतकऱ्यांचे कष्ट .. शेतकरी राजा रात्रंदिवस काबाड कष्ट करून घाम गाळून रक्ताच पाणी करतो तेव्हा आपल्या काळ्या आईच्या पोटातून धान्याचे हिरे काढतो .. त्यांना काय कळणार त्याची किंमत.. या दुनियेत खऱ्याची किंमत कोणालाच कळत नाही..जगात भारी फक्त आणि फक्त शेतकरी राजाच आहे. तो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे.. त्यांच्या इतका प्रेमळ आणि मोठ्या मनाचा कोणीही असू शकत नाही तरी पण जगाला त्याची कदर नाही, हीच खरी शोकांतिका आहे..जय जवान जय किसान..” अनेक युजर्सना या तरुणाचे म्हणणे पटले आहे.