Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्स करतानाचे तर कधी गाणं म्हणतानाचे व्हिडीओ आईवडील शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली चक्क दोन बैलाच्या साहाय्याने शेत नांगरताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओ शेतातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली दोन बैलांच्या मदतीने शेत नांगरताना दिसत आहे. सोशल मीडियावर शेतात काम करणाऱ्या लहान मुलांचे तुम्ही कधीच पाहिले नसावेत. या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.खरं तर ही शेतकऱ्याची मुलगी आहे आणि व्हिडीओत तुम्हाला दिसेल ती तिचे वडील तिला शेत नांगरण्याची ट्रेनिंग देत आहे.

हेही वाचा : …कलेला तोड नाही! कोल्हापूरच्या तरुणाने भर रस्त्यावर काढली सुरेख रांगोळी, व्हिडीओ होतोय व्हायरल

या चिमुकलीच्या वडिलांनी तिचा हा व्हिडीओ त्यांच्या amol_kole777 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या वयात ट्रेनिंग घ्यावी लागते तेव्हा तयार होतो हाडामासाचा पक्का खराखुरा शेतकरी”.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शाब्बास बाळा” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या आईने खूप कौतुक केलं. नजर काढत होती आणि सारखं व्हिडीओ बघत आहे. खूप छान. आम्ही पण शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आम्हाला गर्व आहे.. खूप छान बाळा ” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळ्यात भारी आपला शेतकरी”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A farmer giving training to his daughter to plow or cultivate farm video goes viral father daughter love relation ndj