Viral Video : सोशल मीडियावर जंगली प्राणी मानवी वस्तीत वावरत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. वाघ, बिबट्या सिंह मानवी वस्तीत शिरुन पाळीव प्राणी किंवा माणसांवर हल्ला करतानाच्या अनेक घटना कॅमेरात कैद झाल्या आहे.सध्या असाच एका सिंहीणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहीण गायची शिकार करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर एक सिंहीण गायीची शिकार करत आहे आणि गाय तिच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. एक शेतकरी त्याच रस्त्यावरून जात असतो तेव्हा सिंहीणीला गायीची शिकार करताना पाहून शेतकरी गायीची सुटका करण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा सिंहीण गायीला सोडत नाही. जेव्हा तो शेतकरी दगड उचलून सिंहीणीवर फेकतो तेव्हा सिंहीण गायीला सोडून पळून जाते.

हेही वाचा : Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा भांडण; तरुणीने एका तरुणाला सटासट लगवाल्या कानाखाली, पाहतच राहिले प्रवासी.! पाहा धक्कादायक व्हिडीओ

ही संपूर्ण घटना त्या रस्त्यावरुन जात असलेल्या एका चारचाकी वाहनातील व्यक्तीने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या गीर सोमनाथ येथील असल्याचे म्हटले जात आहे.

@VivekKotdiya या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

एका युजरने लिहिले आहे, ” असे चांगले काम एक शेतकरी किंवा कामगारच करू शकतो.” तर आणखी एका युजरने लिहिले आहे,”भारतातील शेतकरी खरे सिंह आहेत.” अनेक युजर्सनी या शेतकऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A farmer saved a cow from lioness attack video goes viral ndj
Show comments