शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची खूव आवश्यकता असते. ट्रॅक्टरशिवाय शेती करणं अशक्य आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. हो कारण नांगरणी असो वा शेतातील माल बाहेर काढण्यासाठी आणि तो बाजारात नेण्यासाठी ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात गरज भासते. परंतु मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढल्यामुळे डिझेलसाठी शेतकऱ्यांना खूप पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ट्रॅक्टर वापरणं परवडत नाही. एका शेतकऱ्याने डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी एक अप्रतिम जुगाड केला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘गरज ही शोधाची जननी आहे’ असं म्हटलं जातं, याचेच उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कारण एका शेतकऱ्याने डिझेलवर ट्रॅक्टर चालवून शेतीमधील कामं करणं परवडत नसल्यामुळे त्याने चक्क सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर बनवला आहे. शेतकऱ्याच्या या जुगाडू ट्रॅक्टरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @IndianFarmer_) नावाच्या अकाउंटवरून शेर केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “हा ट्रॅक्टर ना पेट्रोलवर चालतो ना डिझेलवर… शेतकऱ्याने बनवला आहे असा जुगाड, समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.”

car owner put the car in the other lane
‘अति घाई संकटात नेई’ कार दुसऱ्या लेनमध्ये टाकताच समोरून आला ट्रक अन्… पाहा VIDEO चा मजेशीर शेवट
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
Viral Video
Viral Video : “प्रत्येक गुजराती एलॉन मस्क आहे”, कॅनडामध्ये वीज बचतीचा ‘देसी जुगाड’ पाहून नेटकरी हैराण
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड

हेही पाहा- “प्रतीक्षा संपली, आता निकाल जाहीर होणार…” कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या माकडाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले…

अवघ्या ५२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची माहिती देताना दिसत आहे. तो ही माहिती मजेशीर पद्धतीने आणि सविस्तरपणे सांगत आहे. व्हिडिओमध्ये, ट्रॅक्टरला दोन टाक्या जोडल्याचं दिसत आहे. तर त्या टाकीला पाईपदेखील जोडल्याचं दिसत आहेत. तर व्हिडिओमध्ये माहिती देणार्‍या व्यक्तीने हा जुगाड एमपीमधील देवेंद्र परमार नावाच्या शेतकऱ्याने केल्याचं सांगितलं आहे. शिवाय या ट्रॅक्टरवर वीज तयार करण्यात येते असा दावाही व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

Story img Loader