Viral Video : आई वडील हे मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती असतात. मुलांवर निस्सीम आणि निस्वार्थ प्रेम करणारी ही दोनच माणसं या जगात असतात. मुलांवर चांगले संस्कार व्हावे, मुलांनी जीवनात यशस्वी व्हावे आणि चांगले व्यक्ती म्हणून जगावे, एवढीच अपेक्षा आईवडिलांची असते. अनेकदा मुलांचे चांगले व्हावे, या हेतुने आईवडिल मुलांना रागवताना, मारताना दिसतात. यात त्यांचा हेतू वाईट नसतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वडील लेकाच्या भल्यासाठी बूटाने मारताना दिसत आहे. वडिलाचे हे अनोखे प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बालपणीची आठवण येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आईविषयी बऱ्याचदा बोलले जाते पण वडिलांविषयी तितके बोलले जात नाही. वडिलांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. वडील अनेकदा मुलांच्या भल्यासाठी कठोर वागतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला असेच एक वडील मुलाला त्याच्या चांगल्यासाठी मारताना दिसत आहे, नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊ या.

हेही वाचा : Video : चार वेळा इंग्रजीत पाच लिहून काढले सुंदर मांजरीचे चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल काही मुले टाईमपास करताना दिसत आहे. तितक्यात एका मुलाचे वडील हातात बूट घेऊन येतात आणि बुटाने त्याच्या मुलाला मारतात. व्हिडीओत वडील मुलाला बुटाने मारत रागवताना दिसत आहे. व्हिडीओत दिसेल की इतर मुले भीतीपोटी मान खाली घालून बसलेले दिसतात. व्हिडीओत वडिलांची मुलाविषयीची काळजी आणि प्रेम दिसून येते. त्याच्या भल्यासाठी वडील मुलाला मारताना दिसतात.

@HasnaZaruriHai या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडिलांचे असे प्रेम आता दिसत नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याच औषधामुळे नव्वदच्या दशकातील मुले सुधारले.” तर एका युजरने लिहिलेय, “कटू आठवणींची का पुन्हा आठवण करून देतोय?” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलांना पण भीती वाटायची की त्यांना पण मार पडेल”