Viral Video : वडील मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. एका वडिलांसाठी मुलगी हे जीव की प्राण असते. मुलीच्या आनंदासाठी एक वडील वाट्टेल ते करतात तर एका मुलीसाठी तिचे वडील हे सुपर हिरो असतात कारण ते तिच्या सर्व इच्छा पुर्ण करतात. लहानाचे मोठे केलेल्या लेकीला जेव्हा सासरी पाठवण्याची वेळ येते तेव्हा वडील आतुन तुटून जातो. तो क्षण फक्त एका वडिलासाठी खूप कठीण असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलीला सासरी पाठवताना वडील ढसा ढसा रडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील असून या व्हिडीओमध्ये नवरी सासरी जाताना दिसत आहे. तेव्हा संपूर्ण कुटुंब भावुक होते आणि वडिलांना सुद्धा अश्रु अनावर होतात. वडील खूर्चीवर बसून लेकीसाठी ढसाढसा रडताना दिसतात तेव्हा नातेवाईक आणि कुटुंब वडिलांना सावरतात पण तरी त्यांचे रडणे थांबत नाही. जेव्हा लेक त्यांच्याजवळ येते तेव्हा ते जागेवरून उठतात आणि मुलीला मिठी मारतात. त्यानंतर नवरी आईजवळ सुद्धा रडताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना त्यांच्या लेकीची आठवण येईल तर काही महिलांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

nagnathhdphotos या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मराठी भावनिक व्हिडीओ” एका युजरने लिहिलेय, “समाजात तुम्हाला प्रेम करणारे खूप भेटतील पण निस्वार्थ प्रेम करणारे हे आपले आई वडीलच असतात” तर एका युजरने लिहिलेय, “खुप प्रेम असतं आपल्या बापाच आपल्यावर पण जगाची रित पाळण्यासाठी मन घट्ट कराव लागतं”

आणखी एका युजरने लिहिलेय, “आई वडिलांच्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण आणि ज्या मुलीला लहानाची मोठी केली आहे तिला दुसऱ्याच्या हातात सोपवणे काय असत हे फक्त वडीलच समजू शकतो.. मित्रांनो आपल्या घरी कोणाची तरी मुलगी येत असते सर्वांची लाडकी असते…. त्या मुलीला सुद्धा खूप जीव लावा तिला कधी माहेरची आठवण नका येऊ देऊ. ती फक्त बायको नाही आपल्यासाठी, आपलं संपूर्ण जग असतं. बायको हे नातं शब्दात नाही सांगू शकतं” एक युजर लिहितो, “हे पाहून खूप वाईट वाटते यार मी पण दोन मुलीचा बाप आहे”

Story img Loader