Viral Video : आई वडील आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकी आणि अनोखा जिव्हाळा दिसून येतो. आताच्या काळात पालकांची मुलांबरोबर मैत्री सुद्धा दिसून येते. मुलांबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ पालक आवडीने सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात किंवा मुलांच्या नावाने अकाउंट उघडत त्यावर पालक मुलांचे मजेशीर व भन्नाट व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाप लेक भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक चिमुकली दिसेल जी अभिनेता अनिल कपूरच्या स्टाइलमध्ये चालत येते आणि तितक्यात तिचे वडील येतात आणि दोघेही बाप लेक अनिल कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर म्हणजेच ‘धिना धिन धा’ गाण्यावर डान्स करायला सुरूवात करतात. ते अतिशय सुरेख डान्स करताना दिसतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. बापलेकीची ही ऊर्जा पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल.

हेही वाचा : नवऱ्याबरोबर भांडण होताच बायकोने मुलांबरोबर केलं असं काही…; Video पाहून तुम्हालाही भरेल धडकी

असं म्हणतात, बाप लेकीचं नातं हे खूप जिव्हाळ्याचं असतं. वडील लेकीला नाजूक कळीप्रमाणे सांभाळतो. तिचे सर्व हट्ट पुरवतो आणि मुलीसाठी तिचा लाडका बाबा हाच तिचा सुपर हिरो असतो. या व्हिडीओमध्ये तुम्हाला बापलेकीच्या नात्यातील हा गोडवा दिसून येईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

हेही वाचा : चिमुकल्यांचं नवीन दुकान! उद्घाटन केलं, मित्र आले अन्… गावाकडील हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस

aditi.b.deshmukh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “बाप लेक”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप खूप खूप खूपच छान नाहीतर आम्ही लहान असताना वडिलांचा नुसता धाक असायचा.” तर एक युजर लिहितो, “दिदी तर खरचं माधुरी दिक्षितचा पण रेकॉर्ड ब्रेक करणार तू….” आणखी एका युजरने लिहिलेय, “छोटी दीदीची एन्ट्री.. एकदम कडक Same like अनिल कपूर …खूप छान डान्स केलास” एक युजर लिहितो, “प्रत्येक बापाला अशी एक लेक असावी जी बापाला आनंदी ठेवेल सुपर डान्स” तर दुसरा युजर लिहितो, “लय भारी…बोले तो झक्कासससsss नंबर”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A father daughter dance so gracefully on anil kapoor song dhina dhin dhaa video goes viral on internet ndj