Viral video: आपल्या घराचा सगळ्यात मोठा आधार हे बाबा असतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी देखभाल घेण्यासाठी रात्रदिवस मेहनत करत असतात मात्र तरीही मुलं बाबांपेक्षा आईच्याच जास्त जवळ असतात. कारण बापाचं नातं भावनिक कमी आणि कर्तव्य जास्त असतं. बाप म्हणजे धाक दरारा हे पूर्वी अनेकांसाठी समीकरण होतं. आई आपल्या आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणार “स्टीयरिंग” असतं तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, “वडील” म्हणजे “अर्जेंट ब्रेक” चा पर्याय असतात. बाबा म्हणजे धाक, बाबा म्हणजे शिस्त हेच आपल्या डोळ्यासमोर येतं, कारण हाच बाबा आपल्याला जगण्यातली शिस्त शिकवत असतो. अशाच एका वडिलांनी बाप काय असतो हे दाखवून दिलं आहे. यामध्ये एका वडिलांनी आपल्या नऊ वर्षाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी स्वत: दोन हात केले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
वाघाला दूरून पाहिलं तरी भल्याभल्यांची भंभेरी उडते. विचार करा तोच वाघ अचानक समोर आला तर काय होईल? वाघ, सिंह, बिबट्या, जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्याशी वैर घ्यायला बाकीचे प्राणीही घाबरतात. त्यामुळे सहसा त्यांच्याशी पंगा घेण्याचं इतर प्राणी टाळतात. कारण हे धोकादायक प्राणी खूप शक्तिशाली असून क्रूर शिकारीही असतात. कधी कोणावर हल्ला करतील आणि फडशा पाडतील कोणीही सांगू शकत नाही. मात्र समोर परिस्थितीच अशी आली की आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडिलांना वाघाशी भिडावं लागलंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर रस्त्यात आपल्या ९ वर्षाच्या मुलीवर विघानं हल्ला केल्यानंतर तिचे वडील वाघाशी भिडले आहेत. त्यांनी मुलीला बाजूला करुन स्वत: वाघाला सामोरे गेले आहेत. यावेळी वाघाचा हल्ला त्यांच्या जीवावर बेतू शकत होता मात्र म्हणतातना बाप बापच असतो लेकीसाठी तो कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो हेच या व्हिडीओतून पाहायला मिळालं आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.या लढाईत वाघाची नखे त्यांना लागत होत मात्र या वडिलांनी हिंमत हरली नाही. अखेरीस वाघाला या बापापुढे माघार घ्यावी लागली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरीही वडिलांच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. तसेच व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत, एकान म्हंटलं आहे की, “एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करु शकतो”