Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर माणसाचे आयुष्य बदलते. विशेषत: मुलीच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. आई वडीलांचे घर सोडून सासरी जावे लागते. मुलीसह तिच्या घरच्यांना खूप दु:ख होते. मुलीला निरोप देतानाचा क्षण कुटुंबाला भावुक करणारा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वडील सासरी जाणाऱ्या मुलीला मोलाचा सल्ला देताना दिसतात. वडीलांचा सल्ला ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना त्यांचे वडील आठवतील.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नानंतर सासरी जाताना दिसत आहे तेव्हा वडील मुलीला सल्ला देतात. वडील म्हणतात, “कोणत्याही वादविवादात जिंकण्याचा प्रयत्न करू नको. प्रत्येक वादविवादात हारशील तर आयुष्य जिंकशील. कधीही असा विचार करायचा नाही की वडीलांचे घर सुटले. माहेर कधीच सुटत नाही. ठीक आहे. बोलणे सुरू ठेव. कोणतेही बोलणे पूर्ण केल्याशिवाय झोपायचे नाही. बोलणे जर सुरू झाले तर ते प्रकरण मिटव आणि पण मिटवताना आपण हार मानायची, तरच आयुष्य जिंकशील. तुझ्या जाण्याचे आम्हाला दु:ख नाही. रडणे आम्हाला आवडत नाही. मी तो वडील जो म्हणतो की लोकांना रडताना पाहून मला रडू आले, मुलीला निरोप देताना खूप आनंदी होतो. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. असेच घर चालवा.”
वडिलांचा हा सल्ला ऐकून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “प्रत्येक वडील असे असायला पाहिजे.” हा भावुक करणारा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
rahul_dholpuriya_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जर आई वडील अशाप्रकारे आपल्या मुलींना समजावून सांगत असेल तर कोणत्याही मुलीचे घर तुटणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “समोरचे कुटुंब सुद्धा चांगले असायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझे वडील सुद्धा असेच आहे. एक युजर लिहितो, “असे वडील सर्वांना भेटायला पाहिजे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.