जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले पोट भरण्यासाठी मेहनत करावी लागते. आपल्या एक वर्षाच्या मुलाला खांद्यावर घेऊन एका इसमाला रिक्षा चालवून दोघांचे पोट भरण्यासाठी जीव तोडून मेहनत करावी लागते आहे. मध्यप्रदेश येथील जबलपूरमधून ही दुर्दैवी बाब समोर आली आहे. या व्यक्तीचा आपल्या बाळाला घेऊन रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्यक्तीचे नाव राजेश असून त्याला मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करावे लागत आहेत. यामधून जे पैसे मिळतात त्यातून तो आपल्या मुलांचे पोट भारत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की राजेशने एका खांद्यावर आपल्या एक वर्षाच्या लहान मुलाला झोपवले आहे आणि दुसऱ्या हाताने तो ही रिक्षा चालवत आहे. तो दररोज आपल्या मुलाला घेऊनच रिक्षा चालवत असतो. तो त्याला घेऊन संपूर्ण शहरभर प्रवासी शोधत फिरतो आणि जेव्हा त्याला प्रवासी मिळतात तेव्हा तो एका हाताने रिक्षा चालवून त्यांना इच्छित स्थळी घेऊन जातो.
स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी माणसाला किती परिश्रम करावे लागतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे राजेश! सरकारच्या दाव्यांच्या विरोधात, राजेशची मजबुरी हे सांगण्यासाठी पुरेशी आहे की सरकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळत नाही. जो कोणीही राजेशला आपल्या मुलाला घेऊन रिक्षा चालवताना पाहतो, तेव्हा तो स्वतःला राजेशच्या मेहनतीचे कौतुक करण्यापासून रोखू शकत नाही. त्याचबरोबर लोक सरकारला असा सवालही करत आहेत की, प्रगतीचा खरा अर्थ मोठमोठ्या इमारती बांधणे हा नसून अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आहे, जे सरकारला सध्या तरी कळत नाही.
“तुही चुकून ऑर्डर झालास…”; स्विगीच्या रिफंडबद्दल सांगणाऱ्या तरुणाला वडिलांचा भन्नाट रिप्लाय
रिक्षाचालक राजेश याने सांगितले की, घरात लहान मुलाशिवाय त्याला एक बहीण आहे, त्या दोघांचे पोट भरण्यासाठी त्याला मजबुरीने रिक्षा चालवावी लागत आहे. तो म्हणतो, मी रिक्षा चालवली नाही तर या दोघांचे पोट कोण भरणार? राजेशने सांगितले की, मुलाला आई नाही त्यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच त्याला मजबुरीने मुलाला खांद्यावर घेऊन रिक्षा चालवावी लागत आहे.