Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. सध्या असाच एक आगीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये धुरात अडकलेल्या मुलाला वाचविण्यासाठी वडिलाची धडपड दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसून येईल एका घराला आग लागली आहे आणि घरातून धूर बाहेर पडत आहे. एक छोटा मुलगा घराच्या बाल्कनीत उभा राहून मदतीची वाट बघत आहे.
तितक्यात वडील येतात आणि बाल्कनी तोडतात त्याबरोबरच अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी वडील मुलाला सुखरुप बाहेर काढतात. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो.

हेही वाचा : ‘कावला’ गाण्यावर आजीचा जबरदस्त डान्स! तमन्ना भाटियालाही टाकले मागे; ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल थक्क

mr_rahul_r.s_3 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिले, “आईवडिलांसाठी त्यांची मुलं सर्वात प्रिय असतात.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिले, “आईची माया आणि वडीलाच्या क्षमतेचा कोणी अंदाजही लावू शकत नाही” तर एका युजरने लिहिले, “देवाची कृपा आहे की बाळ सुरक्षित आहे” आणखी एका युजरने लिहिले, “माझ्याकडे शब्द नाही. अंगावर काटा आणणारा व्हिडीओ”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A father save his child from fire video goes viral on instagram father child love and care ndj
Show comments