Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. अनेक ठिकाणी नदीला पुर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी फिरताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात अनेक जण घराबाहेर पडतात. धबधबे, झरे, नदी इत्यादी ठिकाणी जातात. अशा ठिकाणी स्वत:ला सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली होती त्यानंतर ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि तो वाहून गेला होता.

अशातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन चिमुकले नदीच्या पाण्यात वाहून जाताना दिसतात पण पुढे त्यांचे वडील मदतीला धावून येतात आणि त्यांना वाचवताना दिसतात.

हेही वाचा : जीवापेक्षा फोटो महत्त्वाचा; जंगलात जाऊन तरुणाने चित्त्याच्या बाजूला बसून काढला फोटो, पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

शेवटी वडिलांनीच वाचवला पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या स्वत:च्या मुलांचा जीव

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मुले पुराच्या पाण्यात वाहताना दिसत आहे. तेव्हा त्यांचे वडील मदतीला धावून येतात आणि त्यांना पुराच्या पाण्यातून खूप मेहनतीने बाहेर काढून येतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते मुलांना वाचवतात.

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, वडील दोन्ही मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत काठावर आणतात आणि त्यानंतर काठावर उभी असलेली माणसं वडिलांना व मुलांना पाण्यातून वर काढण्यास मदत करतात. अशाप्रकारे एक वडील त्यांच्या दोन्ही मुलांचा जीव वाचवतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Anant Radhika Wedding : एमएस धोनीची अनंत-राधिकासाठी खास पोस्ट, पत्नीची काळजी कशी घ्यायची याचा सल्ला देत म्हणाला…

aamir_shahabuddin786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पिता साथ है, तो लहरों की क्या औकात”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाप हा बाप असतो” तर एका युजरने लिहिलेय, “वडिलांसारखा दुसरा कोणी नसतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सलाम त्या वडिलांना. व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आले. असे वडील प्रत्येकाला भेटावे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी वडिलांचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.