Father son Viral post:  सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मूळापासून नेहमी घट्ट असतं. मुलं जशी मोठी होतात, तशी त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते. अर्थात, त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो. आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत-नकळत त्यांचं घराकडे, घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं. अशाच स्वत:ला कामात, जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या वडिलांना जेव्हा मुलाच्या आधाराची गरज असते तेव्हाच जर तो ऐन तारुण्यात वाईट वळणाला गेला, तर त्या बिचाऱ्या बापाला जो चिंतेचा घोर लागत असेल आणि त्यामुळे त्याच्या काळजात किती कालवाकालव होत असेल? जरा विचार करा.

वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट संगतीचा विपरीत परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं, कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगलं काय, वाईट काय यातील फरक कळावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली, तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. अशाच एका मुलानं केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे वडिलांवर अशी वेळ आली आहे की त्यांना स्वत:चं हद्य त्याला द्यावं लागत आहे. यावेळी शेवटचा सल्ला वडिलांनी आपल्या मुलाला दिला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येक वडिलांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलाला द्यावा असा सल्ला व्यक्तीनं दिला आहे.

Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Woman married with two men now she live with two husbands in up viral video on social media
आता हेच बघायचं बाकी होतं! दोन नवरे, दोन मंगळसूत्र अन्…, महिलेने केलं दोन सख्ख्या भावांशी लग्न, VIDEO पाहून चक्रावून जाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sanjay Raut on Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Dispute: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिल शेवटचा सल्ला देताना सांगतात की, “पैसा असेल तर सर्वकाही सोपे होते, व्यसन करु नकोस. नेहमी दयाळू आणि प्रामाणिक राहा. जर तुला कुणी त्रास दिला मर्द बनून स्वत:साठी उभा राहा. वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न कर, जगात खूप चांगल्या गोष्टी आहेत. मी नेहमी तुझ्यासोबत असेन..पण इथे नाही…बाय आय लव्ह यू बेटा”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “अरे देवाला तरी घाबरा” प्रसिद्ध मंदिरात चक्क पुजाऱ्यांनीच केला हात साफ; चोरी करण्याची पद्धत पाहून चक्रावून जाल

प्रत्येक वडिलांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा आणि पटल्यास आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही दाखवावा. फक्त एकदा नाही, तर पुन्हा पुन्हा पाहावा आणि आपल्या मुलांना दाखवावा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर world_marathi_नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. अनेकांनी वडिलांवर ही वेळ आणल्यामुळे या मुलावर टीका केली आहे.

Story img Loader