Viral Video : अंतराळ आणि अंतराळवीरांबद्दल सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. अंतराळात प्रवास करणाऱ्यांचे जीवन कसे असेल ? अंतराळवीर कसे नाश्ता करतात किंवा त्यांचे अंतराळातील राहणीमान कसे असते; अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. याआधीसुद्धा अंतराळात नाश्ता आणि कॉफी कशा प्रकारे प्यायली जाते हे व्हिडीओत दाखवण्यात आले होते. तर आज एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अंतराळात अंतराळवीर केस कसे धुतात हे दाखवण्यात आले आहे.
आपण पृथ्वीवर ज्या गोष्टी सहज करतो त्या अंतराळात करू शकत नाही. तिथे राहताना विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, महिला अंतराळवीर केस मोकळे सोडते. गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे केससुद्धा हवेत अगदी स्थिर अवस्थेत उभे राहिले आहेत, तर अंतराळवीर आरसा समोर ठेवते आणि एका सिल्व्हर पाकिटातून काही पाण्याचे थेंब केसावर टाकताना दिसते आहे. हे करताना काही थेंब हवेत उडताना दिसत आहेत. त्यानंतर त्यावर शॅम्पू लावते आणि कंगव्याने केस विंचरून घेते. तसेच नंतर टॉवेलने केस स्वच्छ करून घेते. त्यानंतर पुन्हा पाण्याचे काही थेंब केसांवर सोडून केसांना कंगव्याने स्वच्छ करून नंतर टॉवेलने पुन्हा पुसून घेतले आहे. अंतराळात अंतराळवीर कशा प्रकारे केस धुतात एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
हेही वाचा…शिल्पा शेट्टीने दिलेले हे चॅलेंज स्वीकारा; हात न सोडता, मनगट फिरवून दाखवा; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
अंतराळात केस धुण्याची अनोखी पद्धत :
आपण दररोज जसे अंघोळ करतो तसे अंतराळवीर करू शकत नाहीत. तर अगदी काही पाण्याचे थेंब वापरून अंतराळवीर केस स्वछ करतात. यादरम्यान अंतराळवीराचे केस हवेत अगदी स्थिर उभे आहेत. नासाच्या कॅरेन नायबर्ग या महिला अंतराळवीराने अंतराळात केस कसे धुतले जातात, याची माहिती देऊन व्हिडीओत प्रत्यक्ष करून दाखवले आहे. अंतराळवीरांसाठी सगळ्याच गोष्टी अगदी आव्हानात्मक आहेत; असे या व्हिडीओत दिसून येत आहे.
नासाच्या अंतराळवीर कॅरेन नायबर्ग यांनी अंतराळात आपले केस कसे धुवावे यासाठी हा मार्गदर्शक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, जो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @wonderofscience एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.