पत्रकारांचे काम फारच कठीण असते. वारा-पाऊस-ऊन यांचा सामना करत त्यांना पत्रकारिता करावी लागते. अनेकवेळा तर कित्येक तास एकाच ठिकाणी थांबून तिथे घडणाऱ्या घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहचवाव्या लागतात. हे पत्रकार आपलं काम चूक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. मात्र अनेकदा पत्रकारांना प्रेक्षकांचाही त्रास सहन करावा लागतो. कॅमेरासमोर असल्यामुळे पत्रकारांना या माणसांकडे दुर्लक्ष करून आपले काम करावे लागते. पण असेही काही पत्रकार असतात जे अशा खोडकर माणसांना चांगलीच अद्दल घडवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशाच एका महिला पत्रकाराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने एका मुलाला कॅमेऱ्यासमोर कानाखाली मारली आहे. ती रिपोर्टींग करत असताना हा मुलगा कॅमेरासमोर खोड्या करत होता. त्यामुळे राग अनावर झाल्याने तिने ही कृती केली. ती कथितपणे नुकत्याच झालेल्या ईद अल-अधा या सणाची बातमी देत ​​होती, जो रविवारी, ९ जुलै रोजी जगभरात साजरा झाला. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बुटाच्या आत लपला होता धोकादायक विषारी साप; Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की महिला पत्रकार कॅमेर्‍यासमोर बोलत असताना तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलाने काही तरी केले म्हणून ती चिडली होती. तिने असे का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु तिने रिपोर्टिंग पूर्ण करताच, या खोडकर मुलाला हाताशी धरले. असे म्हटले जात आहे की त्या मुलाने अवास्तव टिप्पणी केली ज्यामुळे या महिला पत्रकाराला राग अनावर झाला.

बायकोपासून अफेअर लपवण्यासाठी फाडली पासपोर्टची पाने; मुंबईकराला जावं लागलं तुरुंगात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दरम्यान, @ItxMeKarma या ट्विटर अकॉउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ३ लाख ८० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून व्हिडीओला १९६८ लाइक्स मिळाले आणि तो ५००हुन अधिकवेळा रिट्वीट्स केला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकजण गोंधळात पडले आहेत. या महिला पत्रकाराने असे का केले, हे अनेकांना समजले नाही. अनेकांना तिची कृती हिंसक वाटली तर काही जणांनी तिच्या या कृतीचे समर्थन करत त्या खोडकर मुलाला सुनावले आहे.