Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला शिक्षिका चिमुकल्यांना सुंदर डान्स शिकवत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (a female teacher teach dance to child students on Bumbro Bumbro song)
शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स
हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील आहे. वर्गखोलीत विद्यार्थी बसलेले दिसत आहे. आणि दोन चिमुकल्या मुली शिक्षिकेसह डान्स करत आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोन विद्यार्थीनी शिक्षिकेसह सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्या ‘बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो’ या लोकप्रिय गीतावर डान्स करताना दिसत आहे.
शिक्षिका त्या चिमुकल्यांना डान्स शिकवत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. व्हिडीओ पाहून काही लोकांची या चिमुकल्यांवरून नजर हटणार नाही. चिमुकल्यांना हा सुंदर डान्स शिकवणाऱ्या शिक्षिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमच्या वेळी कुठे गेल्या होत्या अशा मॅडम काय माहीत?”
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : Pune : रिकामी तुळशीबाग कधी पाहिली का? नेटकरी म्हणाले, “तुळशीबागेला गर्दी शिवाय शोभा नाही ..” पाहा VIDEO
marathi_royal_karbhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या वेळी होत्या का अशा मॅडम ??” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, “एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स मॅडम” तर
एका युजरने लिहिलेय, “मॅडम चा नादच खुळा. आमच्या वेळेस अशा मॅडम असत्या तर मी ऋतिक रोशन झालो असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “मॅडमने पण त्या गाण्यावर डान्स केला आहे शाळेत असताना” काही लोकांनी शिक्षिकेवर टीका सुद्धा केली आहे. एका युजरने लिहिलेय, “शिक्षण शिकवा मॅडम लेकरांना” तर एका युजरने लिहिलेय, “देशावरची गाणी आणि लोकगीत वर नाचा”