सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. चहाच्या दुकानात एकमेकींना मारहाण करणाऱ्या मुलींचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. शिवाय व्हिडीओमध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीच्या अंगावर खुर्च्या फेकून मारत आहेत त्यामागचं कारण समजल्यावर तर तुम्ही डोक्याला हात लावाल यात शंका नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गोरखपूरमधील असून येथील एका चहाच्या दुकानात एका मुलावरून या दोन मुलींमध्ये भांडण झाल्याचं सांगितलं जात आहे. या मुली चहाच्या दुकानात बसलेल्या असताना त्यांच्यात एका मुलावरुन वाद सुरु झाला आणि यावेळी अचानक एका मुलीने खुर्चीवर बसलेल्या दुसऱ्या मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी तिने एकामागून एक अनेक खुर्च्या त्या मुलीला फेकून मारायला सुरुवात केली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात शूट केली होती, ज्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये, एका चहाच्या दुकानाजवळ ही हाणामारी झाल्याचं दिसत आहे. या भांडणाचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काहीजण या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
हेही पाहा- महिला दुकानात सामान खरेदी करत होती; त्यानं संधी मिळताच केलं जबरदस्ती किस; VIDEO होतोय व्हायरल
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
मुलींच्या भांडणाच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, “गोरखपूर खूप बदललं आहे, दिल्ली-नोएडाप्रमाणे, इथल्या मुलीदेखील मुलांसाठी भांडत आहेत.” दुसऱ्याने लिहिलं, “हे खूप आश्चर्यकारक आहे, पूर्वी मुलं अशी भांडायची आणि आज मुली भांडतायत, देश खरंच बदलत आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “ही मुलगी ज्या पद्धतीने खुर्ची फेकून मारत आहे, त्यामुळे इतर लोक जखमी होऊ शकतात. तिला कशाचीच भीती वाटत नाहीये.”