Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा येतो. काही लोक जीवाची पर्वा न करता वाट्टेल ते करतात. कधी जीव धोक्यात टाकून स्टंट करतात तर कधी इतरांचाही जीव धोक्यात टाकतात
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही लोक पेट्रोल पंपाजवळ शेकोटी पेटवून बसलेले आहेत. थंडीपासून वाचवण्यासाठी शेकोटी पेटवली जाते पण पेट्रोल पंपावर शेकोटी पेटवणार, याचा कोणी विचारही केला नसेल. (A fire was lit at a petrol pump for saving cold netizens were angry after seeing the video goes viral)
चक्क पेट्रोल पंपावर पेटवली शेकोटी
तुम्ही अनेकदा पेट्रोल पंपावर गेला असाल, तिथे अनेकदा फोन आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये, असा सुचना फलक पाहिलेला असेल. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक पेट्रोल पंपावर शेकोटी पेटवून हात शेकताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही लोक खूर्चीवर घोळका करून बसलेले आहे आणि मध्यभागी शेकोटी पेटवली आहे. ही शेकोटी पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ पेटवली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही क्षणभरासाठी धक्का बसेल. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि केव्हाचा आहे, याविषयी माहिती समोर आलेली नाही पण सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
terakyalenadena या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संपूर्ण हायवे समाज घाबरलेला आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यांना भीती वाटत नाही का?” तर एका युजरने लिहिलेय, “लोकांना या गोष्टी सुद्धा कळत नाही?” आणखी एका युजरने लिहिलेय, “या लोकांची नोकरी खरंच जाणार” एक युजर लिहितो, “हे लोक स्वत: मरणार आणि इतरांनाही मारणार” अनेक युजर्सनी या लोकांवर सडकून टीका केली आहे.