तुम्हाला फिरायाला आवडते का? तुम्हाला आयुष्यात आनंदी कसे राहावे जाणून घ्यायचे आहे का? मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिनलँडला भेट देण्याची आणि त्याच्या आनंदाची गुरुकिल्ली जाणून घेऊ शकता तेही मोफत. तुमचा विश्वास बसत नसेल पण हे खरे आहे.य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होय, फिनलँड जगभरातील 10 लोकांना चार दिवसांची सुट्टी मोफत देत आहे आणि आनंदाच्या बाबतीत देश जागतिक चार्टमध्ये का सर्वोच्चस्थानी आहेत हे जाणून घेण्याची संधी देत आहे.

जगातील सर्वात आंनदी देशात फिरण्याची संधी

युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने अलीकडेच फिनलँडला सहाव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित केले आहे. जर तुम्ही भाग्यवान असाल, तर तुम्ही देखील फिनलँडमध्ये फिरु शकता आणि येथील नागरिकांच्या आनंदाचे रहस्य जाणून घेऊ शकता. विशेष म्हणजे या सर्वसाठी तुम्हाला काहीही पैसे खर्च करायचे नाही.

हेही वाचा : दुसऱ्यांच्या घामाचा वास घेतल्याने कमी होऊ शकते मानसिक अस्वस्थता; हे संशोधन विचित्र आहे की उपयुक्त? वाचून सांगा

फिनलँडच्या मास्टरक्लास ऑफ हॅपीनेसला द्या भेट

फिनलँडमधील सर्वात मोठे तलाव क्षेत्र असलेल्या फिनलँडच्या लेक डिस्ट्रिक्टमध्ये जून महिन्यात फिनलँडच्या मास्टरक्लास ऑफ हॅपीनेसला भेट द्या. देशाच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटनुसार, यासाठी यातुम्हाला फक्त साइन अप करायचे आहे आणि सोशल मीडिया चॅलेंज पूर्ण करायचे आहे जिथे तुम्ही तुमच्या आतील फिनला चॅनेल कराल!

ते याला फाइंडिंग युवर इनर फिन म्हणत आहेत आणि तो वैयक्तिक मास्टरक्लास असणार आहे. निसर्गासह संतुलित जीवन, शरीर आणि आत्म्यासाठी अन्न, आपल्या सभोवतालची जंगले आणि निसर्ग अनुभवण्याचा एक निरोगी मार्ग, स्वत: ला आराम देण्यासाठी आवाज आणि संगीत आणि आनंदी जीवन पद्धतीबद्दल सर्वोत्कृष्ट सर्वकाही जाणून घ्या.

दुसऱ्यांच्या घामाचा वास घेतल्याने कमी होऊ शकते मानसिक अस्वस्थता; हे संशोधन विचित्र आहे की उपयुक्त? वाचून सांगा

सर्व काही मोफत पण अट एकच..

इच्छुक व्यक्ती, 2 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करु शकते. चार दिवसांच्या मास्टरक्लाससाठी निवडलेल्या सहभागींना काहीही खर्च येणार नाही. फिनलँडला भेट द्या. फिनलँडला जाण्यासाठी आणि तेथून जाणाऱ्या त्यांच्या फ्लाइटसाठी फिनलँडपैसे देईल. 11 जून रोजी, सहभागी फिनलँडमध्ये पोहोचतील आणि 16 जून रोजी परत येतील. पण अट इतकीच आहे की, अर्ज करण्यासाठी, तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – कंपनीच्या ओव्हनमध्ये कर्मचाऱ्याने केले स्वत:चे जेवण गरम, स्टारबक्सने दिले हाकलून

चार दिवसांची सुट्टी तुम्हाला फिनलँडमधील काही सर्वोत्तम अनुभव घेऊ देईल, जसे की लेक डिस्ट्रिक्ट जाणून घेणे, कुरु येथे मुक्काम – लक्झरी रिट्रीट आणि फिनलँडमधील काही सर्वात प्राचीन जंगलांचा आनंद घेणे. काही वन्य उत्पादनांसाठी जंगलात काही रोमांचक उपक्रम देखील असतील.

हे सर्व तुम्हाला खूप मजेदार वाटतं असेल नाही का? मग वाट कसली पाहाताय तुमचं नशीब आजमावून पाहा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A free vacation and a chance to learn the art of happiness in finland snk