Viral Video : मैत्री ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. मैत्रीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. असं म्हणतात, आयुष्यात एक तरी मित्र असावा, जो आपल्या सुख दु:खात आपल्या नेहमी सोबत राहीन आणि आपला साथ कधीही सोडणार नाही. खरं तर असे मित्र भेटायला चांगले नशीब राहते. नशीबवान लोकांना चांगले मित्र भेटतात जे मित्रांसाठी काहीही करायला तयार होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या मित्राला मरता मरता वाचवते. त्याच्या एका कृतीने मित्राचा जीव वाचतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मित्र रस्त्याने पायी जात आहे. त्यांच्या शेजारी एक ट्रक सुद्धा जाताना दिसत आहे. अचानक ट्रक पलटी मारतो आणि हा ट्रक एका मित्राच्या अंगावर पडणार तितक्यात दुसरा मित्र त्याला जोराने आपल्याकडे ओढतो आणि त्याचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. मित्राच्या जीव वाचवणाऱ्या या मित्राचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्याच्या या कृतीने मित्राला नवीन आयुष्य मिळते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा!”
या व्हिडीओवर लिहिलेय, “जिवलग मित्र.. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.”

हेही वाचा : ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादा सलाम तुमच्या प्रसंगावधानाला… अशावेळी खरंतर माणसाला काय करावं समजत नाही… कदाचित घाई गडबड मध्ये आपण समोरच्या व्यक्तीचा हात सोडून देखील पळू शकतो परंतु तुम्ही जे प्रसंगावधान राखले ते खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे…” तर एका युजरने लिहिलेय, “खरच खुप मनाला लागला हा व्हिडिओ..मरणाच्या दारातुन पण परत आणलं रे मित्रा तु” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाहीतर आजकाल मित्रांवर विश्वास राहिलेला नाही. या दादाने खूप भारी काम केले. सलाम त्याच्या कार्याला” एक युजर लिहितो, “याला बोलतात दोस्ती जिगरी यार बोलतात मानलं भावा तुला” तर एक युजर लिहितो, “शंभर नातेवाई असण्यापेक्षा एक असा मित्र पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A friend saved life of his friend by using presence of mind netizens said having a true friend is better than 100 relatives ndj