सोशल मीडियाच्या काळात आपणाला अनेकदा अशा काही घटना पाहायला मिळतात, ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. कारण आजकाल कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनेकदा लाइव्ह मुलाखतींच्या व्हिडीओचाही समावेश असतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका पोडकास्टसाठी मुलाखत सुरु असताना अचानक असं काही घडतं की ज्याचा कोणी विचारही केलेला नसतो.
हो कारण ऑस्ट्रेलियन पॉडकास्टसाठी सुरु असलेल्या ऑन-कॅमेरा चर्चेदरम्यान, सहभागी झालेल्या पाहुण्यांच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या छतामधून अचानक एक मोठं अजगर निघाल्याचं दिसत आहे, जे पाहून इतर सहभागी झालेले लोकं घाबरल्याचंही पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लाइव्ह पॉडकास्टचे शुट सुरु असताना हे सर्व घडत होतं.
सिडनीमधील एंड्रयू वार्ड यांची एका कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात येत होती. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या छतावर साप लटकलेला दिसला. यावेळी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने वॉर्ड यांना त्यांच्या मागे साप असल्याचं सांगितलं. यावेळी वॉर्ड मागे वळतात आणि सापाला पाहतात. पण ते घाबरत नाहीत. इतकंच नव्हे तर यावेळी ते समोरच्या मुलाखत घेणाऱ्याला सांगतात. तो एक कार्पेट अजगर आहे, तो विषारी नाही.
दरम्यान, यापूर्वी अनेकदा थेट प्रक्षेपण दरम्यान अशा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी बीबीसी रिपोर्टर हॅरी लो यांना लंडनमधील उपनगरातील पाऊस आणि पुराचे वार्तांकन करण्यासाठी पाठवलं होतं. यावेळी ते घटनास्थळाहून रिपोर्टींग करत असतानाच ऑन कॅमेरा त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती, ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शिवाय हॅरीने स्वतः या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, तो एका स्थानिक व्यक्तीची मुलाखत घेताना दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती त्याच्या समोरून बॅग चोरुन नेतो, परंतु तो टीव्हीवर लाइव्ह माहिती देत असल्यामुळे काहीही हालचाल करत नाही.