सध्या सगळीकडे गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर गणपतीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच गणपती विसर्जनाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या व्हिडीओमध्ये एक चिमुकली गणपती विसर्जनाच्या वेळी रडताना दिसत आहे आणि बाप्पाच्या मांडीवर बसून त्याला जाऊ देऊ नका, अशी विनंती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ खूप जुना आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, गणपती विसर्जनासाठी घेऊन जात आहे. त्यासाठी गणपतीची मूर्ती गाडीमध्ये ठेवली आहे, पण गणपतीच्या मूर्तीजवळ एक चिमुकली दिसत आहे. ही चिमुकली गणपतीला घट्ट धरून आहे आणि सोडायला तयार नाही.
व्हिडीओत पुढे दिसेल की, चिमुकली गणपतीसाठी रडताना दिसत आहे. ती चक्क गणपतीच्या मांडीवर बसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : मुंबई रेल्वेस्थानकावर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून प्रवाशांना हसू आवरेना…

_ajay_beats या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गणपती बाप्पा मोरया.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “देवाबाबत असलेली प्रेम भावना या चिमुकलीकडून शिकावी”, तर एका युजरने लिहिलेय, “मुली, बाप्पा आता लवकरच येतोय” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून माझे अश्रू अनावर झाले.”