Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलामुलींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक पालक आवडीने त्यांच्या मुलामुलींचे व्हिडीओ शेअर करत असतात.काही लहान मुलांचे सुंदर डान्स करतानाचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कलावंताला पाहून चिमुकली हुबेहूब लावणी करताना दिसत आहे. चिमुकलीची शिकण्याची ओढ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून लावणीला एक वेगळी ओळख आहे. लावणी सादर करणारे महाराष्ट्रात अनेक कलावंत आहे. अनेक तरुण मंडळी सुद्धा आवडीने लावणी सादर करताना दिसून येतात. सहसा महिलाच लावणी सादर करतात पण हल्ली पुरुष लोकं सुद्धा लावणी सादर करताना दिसून येतात.अनेक कलावंत सोशल मीडियावर त्यांचे लावणी करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एका पुरुष कलावंताने चिमुकलीबरोबरचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लावणी कलावंत दिसेल आणि त्याच्या शेजारी एक चिमुकली उभी असलेली दिसेल. व्हिडीओत वाजले की बारा हे लोकप्रिय मराठी लावणी गीत लावलेले आहेत आणि या गाण्यावर हा कलावंत लावणी सादर करताना दिसत आहे. त्याची लावणी पाहून त्याच्या शेजारी उभी असलेली चिमुकली सुद्धा हुबेहूब लावणी करताना दिसून येते आणि त्या सर्व स्टेप्स करते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही तिला खूप छान डान्स शिकवला. तुमच्यासारखा डान्स करत होती.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप गोड मुलगी आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर”

हेही वाचा : “चंद्र झोपला नाही…” अंगाई गीत ऐकताना चिमुकली मध्येच म्हणाली, पाहा मजेशीर VIDEO

digambar_c_pawar या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला बघून प्रयत्न करत होती मग मी ओढले मग काय मला फेल केले”. हे इन्स्टाग्राम अकाउंट दिगंबर पवार या लावणी कलावंताचे आहे. ते त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लावणी संदर्भात अनेक व्हिडीओ शेअर करत असतात.

Story img Loader