Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पालक त्यांच्या मुलांचे गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या आईने मुलीचा शुट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली अतिशय प्रेमाने कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीला कुत्रा बिस्किट खात नाही त्यानंतर चिमुकली समोर निघून जाते. त्यानंतर कुत्रा पुन्हा तिच्या मागे मागे जातो तेव्हा ती कुत्र्याला पुन्हा बिस्किट खाऊ घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र कुत्रा बिस्किट खातो. कुत्र्याने बिस्किट खाल्यानंतर चिमुकलीचा आनंद बघण्यासारखा असतो. हा व्हिडीओ चिमुकलीच्या आईने शुट केला आहे. या व्हिडीओत दोघी मायलेकी बंगाली भाषेत बोलताना दिसत आहे.
हेही वाचा : Video : चप्पल घालण्यासाठी मद्यपीची केवढी ती कसरत! व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
kolkata_chitrography या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “हृदयस्पर्शी व्हिडीओ”
या व्हिडीओवर युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक युजर्सनी चिमुकलीच्या आईचेही कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “किती सुंदर व्हिडीओ आहे. ताई तुम्ही मुलीला खूप छान शिकवत आहात” एका युजरने लिहिले, “खरंच पालकांनी मुलांना अशी माणूसकी शिकवणे गरजेचे आहे” आणखी एका युजरने लिहिले, “हृदयस्पर्शी, किती गोड मुलगी आहे”