Viral Video : संस्कार म्हणजे शिस्त, थोरमोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी, परोपकारी. असं म्हणतात, मुलांना चांगले संस्कार देणे हे आईवडीलांच्या हातात असते. चांगले संस्कार मिळालेले मुले आयुष्यात पुढे चांगली व्यक्ती होतात. त्यांना लोक त्यांच्या माणुसकीमुळे ओळखतात. ते इतरांना मदत करायला नेहमी धावतात. इतरांबरोबर प्रेमाने व आदराने वागतात. सोशल मीडियावर माणुसकी व संस्कार दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावर बसलेल्या एका आजोबांना पाणी पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
चिमुकलीने दाखवली माणुसकी
हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. ती रस्त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीला पाणी पाजताना दिसत आहे. हे आजोबा सुद्धा त्या चिमुकलीच्या हातून पाणी पिताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत त्या चिमुकलीचे वडील येतात. तेव्हा ती बॉटल खाली ठेवते आणि तिचे वडील तिला कडेवर घेऊन निघून जातात. या व्हिडीओवर लिहिलेय, “पैसा संपत्ती, ऐश्वर्य असून काही उपयोग नसतं,संस्कार आणि माणुसकीही तेवढीच फार महत्त्वाची आहे.” हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सोशल मीडियावर या मुलीवर केलेल्या संस्काराचे कौतुक केले जात आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video
sai_writes_084 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संस्कार आणि माणुसकी..!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही लहान मुलगी माणुसकीचा खरा आदर्श आहे. अप्रतिम.माणसाने आपलं माणूसपण जपलं की माणुसकी टिकून राहते कारण एक दिवस आपली राख होणार आहे, जर एक दिवस आपण आपला देह सोडून जाणार आहोत तर अहंकार कसला करायचा!. ज्या भगवंताची आपण आराधना करतो तोच शिव प्रत्येक जीवामध्ये आहे हे ज्याला कळलं तो माणुसकी कधीच विसरणार नाही हे नक्की” तर एका युजरने लिहिलेय, “माणुसकी आणि संस्कार नाही तर काही नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “या चिमुकलीच्या आई आणि वडीलांचे मनापासून आभार”