Viral Video : शाळेचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील कधीही न विसरणारे दिवस असतात. शाळेच्या दिवसांमध्ये घडलेल्या अनेक गमती जमती आजही आपल्याला आठवतात आणि आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली भर वर्गात झोपताना दिसत आहे. ती वर्गात बसलेली असताना डुलकी घेताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Puneri pati viral Puneri Old Man Punctures Car Tyre For Parking In His Spot Funny Video
पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल, आजोबांचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
Punekar man wrote funny message in back of the car Photo goes viral on social media puneri pati
याला म्हणतात पुणेकरांचा धाक; पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल
viral video of a uncle dance at wedding baarat on dhagala lagli kal marathi song
“ढगाला लागली कळ पाणी…” गाण्यावर मामांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की
Do not crowd the near by sea
समुद्रकिनाऱ्यापासून लांब उभे रहा! मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील VIDEO होतोय व्हायरल
Cow viral video
“हे फक्त भारतातल्या गाईच करु शकतात” गाईनं दाखवलेली हुशारी पाहून पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Vicky kaushal tauba tauba song Video The village woman rupali sing danced to the song
VIDEO: गावच्या महिलेचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप, विकी कौशल म्हणतो…
Mumbai local video of some girls dancing on a marathi song Vatanyacha gol dana in mumbais local train is going viral on social Media
मुंबई लोकलमध्ये “वाटाण्याचा गोल दाणा पोरी…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

भर वर्गात चिमुकलीची झोप सुटेना!

या व्हायरल व्हिडीओ एका वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वर्ग सुरू आहे आणि विद्यार्थी खाली बसलेले आहे. या विद्यार्थ्यांपैकी एका चिमुकल्या विद्यार्थीनीला खूप झोप येते तेव्हा ती डुलकी घेताना दिसते शेवटी डुलकी घेता घेता तिचा तोल जातो. ती खाली पडते आणि तिला जाग येते. त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि व्हिडीओ बनवणारी व्यक्ती पाहून तिला हसू आवरत नाही आणि ती गोड हसताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : अभ्यास करतानाच पोलीस भरतीचा निकाल लागला; सर घरी आले अन् कष्टाचं चीज झालं; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

sir_avinash_patil86 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निरागस हास्य” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘फक्त आनंद…’ हिरवा झेंडा फडकवणाऱ्या लोको पायलटला पाहून चिमुकलीची ‘ती’ गोंडस कृती; पाहा आजोबा-नातीचा ‘तो’ प्रेमळ VIDEO

एका युजरने लिहिलेय, “देवाने पृथ्वीतलावर निस्वार्थी आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी घेतलेल एक छोटस निरागस रूप म्हणजे बालपण…” तर एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी… खऱ्या स्वर्गाचा आनंद बालपणीच असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “खुप छान आहे चिमणी.. किती गोड हसते” एक युजर लिहितो, “आम्ही ही असेच झोपायचो शाळेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी कमेंटमध्ये त्यांच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक शाळेतले व्हिडीओ व्हायरल होत असतात. युजर्स या व्हिडीओंवर भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.