सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली हिल्स घालून चालताना दिसत आहे. चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपण आठवू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या चिमुकलीने घरच्या चप्पल स्टँडवरुन आईची हिल्स बाहेर काढली आणि पायात घातली. आईची हिल्स घालून ती घरभर फिरताना दिसत आहे. हिल्स इतकी उंच आहे की चालताना चिमुकलीचा तोल सुद्धा जात आहे. ती भिंतीला पकडून चालताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही चिमुकली हिल्स घालून चक्क चालण्याचा सराव करत आहे.

हेही वाचा : VIDEO : वर्दीतला कलाकार! पोलिसांनी केला चंद्रा गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

adoorablebabies या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्ट आणि हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. adoorablebabies या अकाउंटवर असे अनेक लहान मुलांचे व्हिडीओ यापूर्वीही शेअर केलेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl child walking wearing hills of her mother cute video goes viral ndj