Video Viral : सोशल मीडियावर चिमुकल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही गोंडस दिसणाऱ्या चिमुकल्यांचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कोळी साडी नेसून ही चिमुकली रस्त्यावर फोटो शुट करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटोशुटचे वेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. नटून थटून फोटो काढायला अनेकांना आवडतं. ही चिमुकली सुद्धा छान कोळी साडी नेसून रसत्यावर फोटो काढाताना या व्हिडीओत दिसत आहे. ती फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ देताना सुद्धा व्हिडीओत दिसत आहे. ती कोळी साडीमध्ये खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिचे सुंदर रुप पाहून रस्त्यावरील लोकांची तिच्यावरुन नजर हटत नाही. हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहा.

हेही वाचा : “किसी दिन ये तमाशा…”; धावत्या मेट्रोमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

dil_se_ram_offical या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पालकांसह लहान मुलेही खूप जास्त अॅक्टिव्ह दिसून येतात. पालक स्वत:बरोबर त्यांच्या चिमुकल्यांचेही फोटो-व्हिडीओ आवडीने शेअर करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl child wearing koli saree doing photo shoot on road people watching a cute girl video goes viral ndj
Show comments