सध्या सोशल मीडियावर एक संतापजनक आणि तितकाच भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतून घरी परतणाऱ्या मुलींची दोन मुलांनी छेड काढल्यामुळे भयानक अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन शाळकरी सायकरवरुन घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील ओढणी ओढली, ज्यामुळे विद्यार्थीनीच्या सायकलचा तोल बिघडला आणि ती घसरून रस्त्याच्या मधोमध पडली, याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने मुलीला जोराची धडक दिल्यामुले तिचा मृत्यू झाला. या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर अनेकांनी दोषी तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोन तरुणांना आणि तिला धडक देणाऱ्या बाईकस्वाराला अटक केली आहे.

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल

हेही पाहा- तरुणीचा गुपचूप व्हिडीओ शूट करत होता मुलगा, आई-वडिलांनी पकडताच म्हणाला, ती तर माझ्या बहिणीसमान…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलींची छेड काढणारे तरुण एकमेकांचे भाऊ असल्याचं सांगण्यात येत आहे. हिरापूर बाजारपेठेत दुचाकीवरून आलेल्या या दोघा भावांनी सायकलवरुन जाणाऱ्या मुलींना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलींनी थांबण्याऐवजी सायकलचा वेग वाढवला. यादरम्यान दोन्ही नराधमांनी एका मुलीची ओढणी ओढली, ज्यामुळे तिचा तोल गेला आणि तिची सायकल रस्त्याच्या मधोमध पडली. यावेळ मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीने रस्त्यावर पडलेल्या मुलीला जोराची धडक दिल्यायामुळे विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यातून त्यांना घटनेची संपूर्ण माहिती मिळाली. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांत विनयभंग आणि मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरसमहर येथील रहिवासी असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. तसेच मुलीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला देखील अटक केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader