Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की पाहून कोणीही आश्चर्यचकीत होऊ शकते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने थेट केसांवर इस्त्री फिरवली आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. तुम्ही कधी केसांबरोबर हा जुगाड केला आहे का?
केस स्ट्रेट करण्यासाठी हेअर स्ट्रेटनरचा वापर केला जातो पण ज्या लोकांकडे स्ट्रेटनर नाही ते लोकं विचित्र जुगाड करताना दिसतात. केस स्ट्रेट करण्यासाठी हे एक जुगाड खूप प्रसिद्ध आहे. विशेषत: मुली हा जुगाड करताना दिसतात. इस्त्रीच्या मदतीने केस स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एका तरुणीचा इस्त्रीच्या मदतीने हेअर स्ट्रेट करतानाचा व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी इस्त्रीच्या मदतीने केस स्ट्रेट करताना दिसत आहे. ती ज्या पद्धतीने केस स्ट्रेट करत आहे, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ज्या लोकांकडे हेअर स्ट्रेटनर नाही, ते हा अनोखा जुगाड करतात पण ज्या लोकांनी हा जुगाड आजवर केला नसेल ती लोकं हा व्हिडीओ पाहून अवाक् होईल. हा जुगाड खरंच केसांसाठी चांगला आहे का? की याचे काही दुष्परिणाम आहेत का? असा प्रश्न या लोकांना पडू शकतो.

हेही वाचा : रिलसाठी काहीही! काकांनी चक्क बसस्टॉपवर केला अतरंगी डान्स; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नेटकऱ्यांनी सांगितले त्यांचे अनुभव

ishayadav__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलीचं सुख आणि दु:ख” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांचे वाईट अनुभव सांगितले आहे. एका युजरने लिहिलेय, “मी हॉस्टेलमध्ये असताना असे केस स्ट्रेट करायची पण अनेकदा केस जळायचे.” तर एका युजरने लिहिलेय, ” प्लीज असं करू नका यामुळे केस जळतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “यामुळे माझे अनेकदा केस जळले पण तरीसुद्धा मी इस्त्रीने केस स्ट्रेट करते” काही युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.