Viral Video: सोशल मीडियावर लोक कधी काय जुगाड करतील हे सांगता येत नाही. अनेकदा एकापेक्षा एक भन्नाट जुगाड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण पाहतो. ज्यात कधी कोण शर्टाला इस्त्री करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतं, तर कधी कोणी गाडीत गरम होऊ नये म्हणून घरातला एसी लावतं. असे एकापेक्षा एक हटके जुगाड पाहून युजर्सही स्वतःचे मनोरंजन करून घेतात. दरम्यान, आता अशाच एका हटके जुगाडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हा जुगाड एक लहान मुलीने केला आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
मागील काही दिवसांपूर्वी असाच एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर आला होता, ज्यात एका लहान मुलाचा हलणारा दात काढण्यासाठी पोपटाचा वापर करण्यात आला होता. यावेळी पोपटाने त्या मुलाचा दात स्वतःच्या चोचीने काढला होता. या चर्चित व्हिडीओनंतर आता पुन्हा असाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका लहान मुलीने तिचा हलणारा दात पाडण्यासाठी एक हटके ट्रिक वापरलेली दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @josesilva_2010 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका लहान मुलीने तिच्या हलणाऱ्या दाताला एक धागा बांधला असून तो धागा तिने ड्रील मशीनला जोडलेला आहे. काही वेळाने ड्रील मशीन सुरू होते आणि एका झटक्यात त्या मुलीचा हलणारा दात खाली पडतो. दात पडलेला पाहून आधी ती मुलगी घाबरते, त्यानंतर स्वतःच मोठ्या कौतुकाने हसते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून यावर युजर्स विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. काही जण या व्हिडीओला मजेशीर म्हणत आहेत, तर काही जण यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
हेही वाचा: बापरे! मासा सापडला समजून पठ्ठ्याने चक्क सापालाच मारली मिठी; थरारक VIDEO पाहून युजर्सना फुटला घाम
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाल्या असून यावर चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. यात एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “बापरे, ही कुठली विचित्र पद्धत दात काढायची”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हिचे आई-बाबा कुठे आहेत, त्यांचे लक्ष नाही का हिच्यावर”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “ही मुलगी खूप करामती आहे.” तर आणखी एका युजरने ही मुलगी जरा वेडी आहे का? असं गमतीत लिहिलं आहे.