Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर अंगावर काटा आणणारे असतात तर काही व्हिडीओ समाजातील खरी परिस्थिती सांगणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समाजातील एक कटुसत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी चक्क पाण्याबरोबर पोळी खाताना दिसत आहे. ही लहान चिमुकली आजूबाजूला कचरा असलेल्या ठिकाणी एकटी बसलेली दिसत आहे आणि पोळी पाण्यात बुडवून खात आहे. पुढे मुलगी तेच पाणी पितानाही दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल.
@AAnamika_ हा ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “शासको के मुँह पर यह हकिकत का तमाचा है !!”
हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहे. काही युजरनी दु:ख व्यक्त केले तर काही युजर्सनी सरकारला ट्रोल केले आहे. एका युजरनी लिहिले, ‘निःशब्द’ तर आणखी एका युजरनी लिहिले, ‘ हा खऱ्या भारताचा फोटो आहे.’