Viral Video : आपल्या आयुष्यात आईवडीलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई वडील मुलांच्या आनंदासाठी एवढं काही करतात, ते आपण मोजू शकत नाही. आईवडील मुलांचे सर्वात मोठे आधारस्तंभ असतात. त्यांची जागा आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने वडील गमावल्यानंतर आयुष्यात किती बदल होतो, हे सांगितले आहे. वडील गेल्यानंतर दिवाळी सण कसा असतो, हे सुद्धा ही तरुणी या व्हिडीओमध्ये सांगते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांच्या त्यांच्या आईवडीलांची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे जुने दिवस आठवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये ती सांगते, “आठ दिवसाआधी आणलेल्या किराणाच्या पिशवीतल्या साबणावरूनच दिवाळीची ओढ असायची. बाबा होते तेव्हा खूप काही असायचं पण आता असं काही वाटत नाही. काय माहित ती उत्सुकता बाबांबरोबरच गेली. काही लोकांसाठी दिवाळी नाही ही. सांगण्याचा उद्देश वडीलांच्या असण्यानेच आणि असेपर्यंतच सण वाटतो नाहीतर फटाक्यांचा स्टॉलवर आपला हट्ट पुरविणारा कोण असतं. आज खिशात कमवत असल्याने नवीन कपडे घेण्यास पैसा आहे पण ती चमक कुठून आणू जी कपड्यात नाही तर चेहऱ्यावर दिसून यायची. दिवाळी आली. सर्वांना सांगते, वडीलांना वेळ द्या बाकी काही होत जात राहील. कारण बाप कसलाही असू द्या त्याचं असणं जरुरी आहे.”

हेही वाचा : “किती शिकला यापेक्षा शिक्षणातून काय शिकला हे महत्त्वाचं”, शाळेच्या मैदानावर कचरा गोळा करणाऱ्या चिमुकल्याने केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “भारताने जर्मन उपकरणांची खरेदी करणं थांबवलं पाहिजे”, पीयूष गोयल यांची जर्मनीच्या व्हाइस चान्सलर यांना तंबी; दिल्ली मेट्रोतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

vaishnavi_mirkhale या तरुणीने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं आहे, बाप आहे तोवर सर्व हट्ट पुर्ण होतात.” तर एका युजरने लिहिलेय, “खरं बोलली तू ग प्रत्येक दिवाळीला मला बाबाची आठवण येते. बाबा नाही तर खूप काही हरवल्यासारखे वाटते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “वडीलांना वेळ द्या. त्यांना समजून घ्या. सर्व काही आहे पण बाबा तुम्ही नाही.” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून भावुक झाले. काही युजर्सना त्यांच्या वडीलांची आठवण आली तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.