यंदाच्या गणेशोत्सवात सर्वांनी एक गाणं वारंवार ऐकले असेल, अनेकदा गुणगुणले आणि त्या गाण्यावर नाचलेही असतील. कोणतं गाण? अहो तेच…”आमच्या पप्पांनी गणपती आणला.” साईराज केंद्रेच्या रिल्स व्हिडीओमुळे हे गाणे तुफान व्हायरल झालं. त्यामुळे या गाण्याचे मुळ गायक असलेले दोन चिमुकले म्हणजे माऊली आणि शौर्या घोरपडे हे देखील प्रकाशझोतात आले. अनेकांनी या गाण्यावर रिल्स व्हिडीओ पोस्ट केले गणपतीमध्ये अनेक लहान मुलांनी यावर डान्स केला अनेकांनी या गाण्याचे नवनवीन मजेशीर स्वरुप तयार केली जसे की, ”आमच्या पप्पांनी हाणला केले’ असे गाणं तयार करून त्यावर मजेशीर व्हिडीओही पोस्ट केले. अजूनही हे गाणे चर्चेत आहे.
सध्या या गाण्याचे एक नवीन स्वरुप ऐकायला मिळते आहे. एका तरुणीने आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे चक्क विणेवर सादर केली. विणेवरील या गाण्याची धुन ऐकून तुम्ही चकीत होऊन जाल. लोकांना हे आमच्या पप्पांनी गणपती आणला गाण्याचे विणेवरील वादनाचे स्वरुप फार आवडले आहे.
हेही वाचा – ”आमच्या पप्पांनी गणपती आणला” फेम चिमुकला आहे तरी कोण? रातोरात झाला स्टार; नवा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला”; चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते,पाहा व्हायरल व्हिडिओ
इंस्टाग्रामवरया विना श्रीवाणी (सत्यवनी परानुकुशम) veenasrivani_official अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. साईराज सारखेचे या तरुणीचे हावभाव देखील गोंडस होते. लोकांना तिचे कौशल्य आणि चेहऱ्यावरील हावभाव दोन्ही आवडले. लोकांनी या व्हिडीओला पंसती दर्शवली आहे आणि अनेकांनी कमेटं करून कौतूक केले आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, ”साक्षात माता सरस्वती आहे तुमच्याकडे”, दुसऱ्याने लिहिले की, ”तुमच्या हावभावांनी माझे मन जिंकलं” तर कोणी तिच्या गोंडस हास्यावर फिदा झाले.