Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. घरबसून तुम्ही जगभरातील अनेक व्हिडीओ पाहू शकता. कधी डान्स व्हिडीओ तर कधी गाण्याचे व्हिडीओ, कधी स्टंट व्हिडीओ तर कधी जुगाड व्हिडीओ सुद्धा चर्चेत येतात. काही लोक त्यांचे चांगले वाईट अनुभव सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दुचाकीचालकाचा अपघात झालेला दिसून येतो. या प्रकरणाविषयी जाणून घेऊ या सविस्तर (a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider shocking video goes viral on social media)

काय व्हायरल होत आहे? (a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider )

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती दुचाकी चालवत आहे आणि तो हिरवागार निसर्गाचे कौतुक करताना दिसत आहे. पुढे तो सांगतो की आमच्याबरोबर एक तरुणी सुद्धा आहे आणि ती बाइक राइडर आहे. तिचे कौतुक करणे सुरू असताना तिची दुचाक स्लीप होते आणि ती खाली पडते. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की तिला गुडघ्याला गंभीर जखम झालेली दिसत आहे. पुढे सर्व बाइक रायडर तिच्याजवळ जातात आणि तिला मदत करतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : PHOTO: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”

पाहा व्हायरल व्हिडीओ ( Shocking Viral Video)

हेही वाचा : रस्त्यात तिला अडवलं अन्…, आधी कानाखाली मारलं मग जमिनीवर आदळलं, दुचाकीस्वाराने केला महिला कॉन्स्टेबलवर हल्ला! पाहा धक्कादायक VIDEO

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाइक राइडर तरुणीचा झाला अपघात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तुझी नजर लागली” तर एका युजरने लिहिलेय, “स्पीडने टर्न घेणे चुकीचे आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “कौतुक करताच पडली” काही युजर्सनी तरुणीची चूक असल्याचे सुद्धा सांगितले.
यापूर्वी असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. अनेकदा छोट्या मोठ्या अपघातानंतर मुलीला ‘पापा की परी’ म्हणून चिडवले जाते.