Viral Video : असं म्हणतात, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” हे खरंय. लहानपण खूप सुंदर आणि गोड आठवणीने भरलेले असते. लहानपणीच्या आठवणी या आपण कधीही विसरू शकत नाही.सध्या असाच एका शाळकरी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिचे एसटीवरील प्रेम पाहून तुम्हीही भारावून जाल. काही लोकांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक शाळकरी चिमुकली दिसेल. ती बसस्थानकावर आली आहे. कारण काय तर तिला बसेस खूप आवडतात. त्यामुळे ही मुलगी बसेस बघायला बसस्थानकावर आली आहे या मुलीने शाळेचा गणवेश घातला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बसस्थानकावर या शाळकरी मुलगी एकटी उभी असलेली पाहून एक काका विचारतात, “इथे अशी का उभी आहे?”( कदाचित हे काका एसटी कर्मचारी असावेत.) त्यावर ती तरुणी म्हणते, “बसेस बघायला आली आहे. मला बसेस खूप आवडतात. खूप दिवसाची इच्छा होती पण यायलाच मिळाले नाही पण आज काही करून बघू या असं ठरवलं. बसेस बघून खूप आनंद झाला असं वाटतं की दहावी पास झाली.”
एसटीवरील चिमुकलीचे प्रेम पाहून काका भारावून जातात आणि तिला म्हणतात, “असंच एसटीवर प्रेम कर आपली माय माऊली लाल परी एसटी वाचली पाहिजे.” त्यावर तरुणी म्हणते, “एसटी वाचली पाहिजे आणि फेमस झाली पाहिजे.” काकांचा आणि शाळकरी मुलीचा हा संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवतील. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एसटीबद्दल प्रेम असावं तर असं”
पाहा व्हायरल व्हिडीओ
javed_clickz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पण असाच एसटी बघायला शाळेचा खाडा करून जायचो. मला पण एसटी खूप आवडते. वयाची पन्नाशी होत आली तरी अजून एसटीनेच प्रवास करतो” तर एका युजरने लिहिलेय, “लालपरीवर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय. सर्वसामान्य लोक आपल्या लालपरीवर खूप विश्वास आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुखाचा प्रवास म्हणजे लालपरी”