आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय काय करतात. सध्या तर अनेकजण रील्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात असतात. याच नादात काही दुर्घटना देखील होतात. कधी कधी तर अशा घटना घडतात की आपल्याला ते व्हिडीओ पाहताना हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एक मुलगी रिल्स बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत अशी एक घटना घडते, जी बघून आपल्याला नक्कीच हसायला येईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ही मुलगी एका नदीच्या किनाऱ्याला रील बनवत आहे. ही मुलगी मोबाईलचा कॅमेरा चालू करून मोबाईल स्टॅन्डला लावते. यानंतर ती मागे वळून डान्स करून लागते. यादरम्यान तिचा मोबाईल पाण्यात पडतो.
या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न
The Kashmir Files बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी रिक्षाचालकाची खास ऑफर; म्हणाला, “हा चित्रपट…”
दुसरीकडे मुलीला याबद्दल काहीच कल्पना नसते. तिला वाटत असते की तिचा डान्स कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत आहे. मात्र जेव्हा ती मागे वळून डान्स करू लागते, तेव्हा मोबाईल स्टॅन्डसोबतच पाण्यात पडतो आणि मुलीला याबद्दल काहीच माहित नसते. यानंतर जेव्हा ती डान्स संपवून मागे वळते तेव्हा तिला समजते की तिचा फोन पाण्यात पडला आहे.
तुम्हाला सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये व्हिडीओ बनवण्याच्या नादात लोकांचे मोबाईल चोरी होतात, पडतात, हरवतात. हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की तो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा व्हिडीओ mobile_photography या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.