Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच गुढीपाडवा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक शहरात गुढी पाडवा निमित्त रॅली, ढोल ताशा पथक आणि लोकांची गर्दी रस्त्यावर दिसून आली. सोशल मीडियावर गुढी पाडव्यानिमित्त सण उत्सवाचे अनेक व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईची एक तरुणी दिसत आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा
व्हायरल व्हिडीओमध्ये एक सुंदर तरुणी दिसत आहे. तिने नऊवारी नेसली आहे. कपाळावर चंद्रकोर, हातात बांगड्या, गळ्यात दागिने आणि नऊवारीत ती अतिशय सुरेख दिसतेय. तिचा हा मराठमोळा लूक पाहून कोणीही थक्क होईल. विशेष म्हणजे ती नऊवारी नेसून दुचाकीवर बसली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे ती लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये तिच्यासह अनेक जण दुचाकी चालवत रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसत आहे. हा फक्त एक व्हिडीओ नाही तर तिचे असे अनेक व्हिडीओ तिचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे
हा व्हिडीओ मुंबईच्या गिरगाव परिसरातील आहे आणि या तरुणीचे नाव गौरी मोरे असून ती दरवर्षी गुढी पाडव्याला सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे व्हिडीओ आणि नऊवारीवरील फोटो दरवर्षी व्हायरल होतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Video)
aamchi_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गिरगाव गुढी पाडवा फेम”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सण हा सण राहिला. नाही, लोक फक्त इंस्टाग्राम रील आणि स्टेटस स्टोरीसाठी जातात, बाकी पहिल्यासारखी मज्जा नाही!उत्सवाला सोशल मीडिया फेव्हर झाला आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही फक्त गुढीपाडव्याला दिसते” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय सुंदर आहेस राव ही” एक युजर लिहितो, “व्हिडीओ मुंबईचा आहे पण पोरगी आमच्या पुण्याची आहे ही” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.