सध्या अशा एका लहान मुलीचा जन्म झाला आहे, जिला जन्मताच ६ सेमी लांब शेपटी आहे. शिवाय ही शेपटी पूर्णपणे त्वचा आणि केसांनी झाकलेली आहे. हे प्रकरण मेक्सिकोच्या ग्रामीण भागातील असून या मुलीला शेपटी असल्याचं पाहून डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या आणि विचित्र बातम्या ऐकत असतो. तर काही बातम्या अशा असतात की त्या वाचूनही त्यावर विश्वास ठेवणं कठिण होतं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, येथील एका रुग्णालयात महिलेने सी सेक्शन म्हणजेच ऑपरेशनद्वारे झालेल्या प्रसुतीद्वारे तिने एका मुलीला जन्म दिला आहे. शेपटी असलेल्या मुलीला इतर कोणतीही आरोग्य समस्या नव्हती, परंतु तिला एक शेपटी होती शिवाय त्याला स्नायू आणि नसाही होत्या.

हेही वाचा- “ट्विटर वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस” एलॉन मस्कने शेअर केलेला सेक्सी फोटो पाहून नेटकरी संतापले

या शेपटी असलेली मुलगी आजारी नाही आणि तिचे पालकही निरोगी आहेत. या प्रकरणाची माहिती जर्नल ऑफ पेडियाट्रिक सर्जरीमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. तर या मुलीच्या शेपटीची लांबी ५.७ सेमी आणि रुंदी ३.५ मिमी इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- दिड वर्षाचा चिमुकला वाशिंग मशीनमध्ये पडला, १५ मिनिटांनी बाहेर काढलं पण साबणाच्या पाण्यामुळे…

ऑपरेशन करुन काढली शेपूट –

या मुलीच्या पाठीच्या खालच्या भागाचा एक्स-रे काढला असता त्यामध्ये असे दिसून आले की, शेपटीच्या हाडांमध्ये कोणतीही हाडे किंवा इतर विकृती नाही. ज्याचा अर्थ हा शरीराचा निरुपयोगी भाग आहे. डॉक्टरांनी मेंदू आणि पाठीचा कणा यासह इतर अनेक अवयवांची तपासणी केली. दोन महिन्यांनंतर, मुलगी आणि तिच्या शेपटीची पुन्हा तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये शेपूट झपाट्याने वाढत असल्याचंआढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी शेपूट काढण्याच निर्णय घेतला. त्यानुसार ऑपरेशनद्वारे पोलिसांनी मुलीची शेपटी काढली आणि त्यानंतर मुलीला घरी नेण्याची परवानगी देण्यात आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl with a 6 cm long tail was born in mexico trending news jap