Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य बदलते. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरूवात करतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावी जोडीदाराकडून काही ठराविक अपेक्षा असतात. जोडीदार मग मुलगा असो की मुलगी त्या अपेक्षेनुसार शोधतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणीने तिला लग्नासाठी मुंबईचाच मुलगा हवा असल्याची अपेक्षा तिच्या बायोडाटामध्ये लिहिली आहे. सध्या हा बायोडाटा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या तरुणीने बायोडाटा कागदावर नाही तर चक्क एका पाटीवर लिहिला आहे आणि ही पाटी ती हातात घेऊन मुंबईच्या रस्त्यावर फिरतेय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a girls biodata viral she wanted a boy from only Mumbai and heighted to marry video goes viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. ती हातात पाटी घेऊन मुंबईच्या विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे. तिच्या हातातील पाटीवर कोणताही संदेश नाही तर चक्क तिचा लग्नाचा बायोडाटा लिहिला आहे. त्या पाटीवर लिहिलेय,
“लग्नाचा बायोडाटा
मुलीची माहिती
नाव – सायली सतीश सावंत
शिक्षण – M-COM
जन्म – १८ एप्रिल १९९५
नोकरी – प्रायव्हेट कंपनी आणि इन्फ्लुअन्सर
अपेक्षा – मुलगा हायटेड आणि मुंबईचाच असावा.”
तिच्या या बायोडाटा लिहिलेल्या पाटीकडे बघून लोक तिला शुभेच्छा देत आहे. काही लोक तिच्याबरोबर फोटो काढत आहे तर काही लोक तिच्या पाटीचे फोटो काढत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video )
sayali_sawant18_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आली असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “व्वा ताई मिळतील लवकरच आमचे भाऊजी” तर एका युजरने लिहिलेय, “खरोखरच लग्न करायच काय विचार करत आहेत का आपन सायली आमच्या गावात एक मुलगा नाशिक ला सरकारी जोब करतोय विशाल पवार आहे तुमची वय किती आहे?” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाद नाही करायचा सायली मॅडम जी चा” एक युजर लिहितो, “सायली तू ग्रेट आहे” अनेक युजर्सनी या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.